शिवक्रांती कामगार संघटनेचा यशस्वी करार
लोणावळा – तळेगाव “एमआयडीसी’मधील इना बेअरिंग इंडिया या कंपनीसोबत शिवक्रांती कामगार संघटनेने कामगारांचा बोनस करार केला. या करारानुसार कंपनीमधील तब्बल 250 कामगारांना प्रत्येकी 42 हजार 500 रुपये बोनस मिळणार असल्याची माहिती शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस ऍड. विजयराव पाळेकर यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर काही कंपन्या गतवर्षीच्या तुलनेत कमी बोनस देत असताना इना बेअरिंग कंपनीमध्ये झालेले हा सर्वात मोठा बोनस करार आहे.
शिवक्रांती कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे, संघटनेचे सरचिटणीस ऍड. विजयराव पाळेकर, वरिष्ठ चिटणीस गुलाबराव मराठे, खजिनदार रवींद्र साठे, राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे संघटक प्रतीक पाळेकर व रोहन आहेर यांनी हा बोनसचा यशस्वी करार केला.
करारावर इना बेअरिंग कंपनीच्या वतीने ज्ञानेश्वर शिंदे यांनी, तर शिवक्रांती कामगार संघटनेच्या वतीने प्रतीक विजय पाळेकर, रोहन दिनेश आहेर यांनी व कामगारांच्या वतीने स्थानिक अध्यक्ष प्रशांत गायकवाड, विजय कुडले, अभिजित वाघ, संदीप धायगुडे, रमेश चोरमले, संदीप पेटकर, प्रवीण पवार, श्रीकांत पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या.