गॅस गळतीमुळे आगीच्या 425 घटना

पिंपरी – रेग्युलेटरमधील बिघाडामुळे गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी झाल्या. ही घटना चिंचवड स्टेशन येथे रविवारी सकाळी घडली. यामुळे गॅस गळतीमुळे होणाऱ्या दुर्घटनांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घरगुती गॅसच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जागृती होत असली तरीही गॅस ग्राहकांची संख्या वाढूनही अपघातांची संख्या कमी नसल्याचीच बाब समोर आली आहे. या घटना टाळण्यासाठी आणखी दक्ष राहण्याची आवश्‍यकता आहे. गेल्या नऊ वर्षात पिंपरी चिंचवड शहरात गॅस गळतीमुळे आगीच्या तब्बल सव्वा चारशे घटना घडल्या आहेत. बहुतांश घटना नागरिकांच्या दुर्लक्षितपणामुळे घडत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

असा होतो गॅसचा स्फोट
अनेकदा स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गळती होत असल्याचे दिसून येते. ही गळती छोट्या प्रमाणात असल्याने महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र गळती होत असलेला गॅस घरात साठून राहतो. त्याचा आगीशी संपर्क असल्यास त्याची विध्वंस क्षमता अडीचशे पटीने वाढून त्याचा स्फोट होतो.

गॅसचा वापर करताना महिलांनी ही काळजी घ्यावी
महिलांनी स्वयंपाकघरात गॅस शेगडीचा वापर करताना सुती कपडे वापरावेत.
शेगडीवरून गरम भांडी उचलताना कपड्याऐवजी धातूची पक्कड/सांडशी वापरावी.
स्वयंपाक करताना अपघात टाळण्यासाठी स्वयंपाकघरात महिलांनी केस बांधून ठेवावेत
गॅस शेगडीचा वापर करताना महिलांनी हातात प्लॅस्टिकच्या बांगडया घालणे टाळावे.
गॅस शेगडीच्या वरील बाजूस भांड्यांची मांडणी किंवा इलेक्‍ट्रिक वायरिंग करू नये
रात्री झोपताना गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर बंद करावे; स्वयंपाक घराच्या खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात.

गॅस गळतीमुळे घडल्या घटना
31 डिसेंबर 2018 रोजी कासारवाडी येथील आगीत तीन मुलांसह पाचजण जखमी
15 जून 2018 रोजी पिंपरीतील नेहरूनगर येथील आगीत तीनजण गंभीररित्या जखमी
25 ऑक्‍टोबर 2018 रोजी दळवीनगर येथील आगीत दोन जणांचा मृत्यू; पाच झोपड्या खाक
22 फेब्रुवारी 2019 रोजी मोशीत व्यवस्थित सर्व्हिसिंग न झाल्याने स्फोट; महिला गंभीर जखमी
9 एप्रिल 2019 रोजी वाकडमध्ये अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरमध्ये दोन सिलिंडरचे स्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)