मांडवगण फराटा -शिरूर पूर्व भागात असलेल्या घोडच्या उजव्या कालवा दुरुस्तीला कुरुळी (ता. शिरूर) सुरुवात करण्यात आली.
शिरूर तालुक्यातील सर्वात मोठ्या घोड धरणातील उजव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा तालुक्यातील शिरसगाव काटा, पिंपळसुटी, चिंचणी, तांदळी, फराटवाडी, इनामगाव आदी गावातील क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र मागील अनेक दिवसांपासून कालव्याची ठिकठिकाणी दुरवस्था झाली होती. त्यामध्ये झाडे उगवल्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे लाभार्थ्यांपर्यत पाणी जात नव्हते. तरी कालव्याच्या दुरुस्तीचे काम व्हावे, अशी मागणी लाभक्षेत्रातून होत होती. यासाठी भाजप सोशल मिडीयाचे माजी तालुकाध्यक्ष नितीन थोरात यांनी पाटबंधारेमंञी गिरीश महाजन, आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, घोड कालवा प्रशासनाने दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागामार्फत दोन पोकलेन मशिन उपलब्ध करून दिल्या आहेत.
घोड कालवा दुरुस्तीच्या कामाला कुरूळी (ता. शिरूर) येथून सुरवात करण्यात आली. याप्रसंगी भाजप जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष दादा पाटील फराटे, सहकार आघाडीचे काकासाहेब खळदकर, बाळनाना फराटे, भाजयुमो शिरूर तालुका कार्याध्यक्ष ड. सिद्धेश्वर नांद्रे, कुरूळीचे तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन बोरकर, रमजानभाई जखाते, प्रकाश घोरपडे, प्रल्हाद देशमुख, रावसाहेब परभाणे, प्रमोद ढवळे, संभाजी जाधव उपस्थित होते.