मुंबईत यंदा कोरोनाचे रुग्ण झोपडपट्ट्यांपेक्षा इतर भागांमधून जास्त आढळत असल्याची चर्चा होती. आता या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईत करण्यात आलेल्या तिसऱ्या सेरो सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामुळे कोरोना विरोधातील लढाईची पुढची दिशा ठरवता येणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 36 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेल्याचे सेरो सर्वेक्षणातून उघड झाले आहे. कोविड साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या तिसऱ्या सेरो सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे. ३६.३० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचे दिसून आले आहे.
मुंबईतील सर्व विभागात १० हजार १९७ नागरिकांच्या रक्त नमुन्यांची अँटीबॉडी टेस्ट करण्यात आली होती. लॉकडाऊनचा काय असर पडला? तर राज्यात 67 हजार 160 कोरोनाचे नवीन रुग्ण झोपडपट्ट्यांमधील पॉझिटीव्हीटी रेट घटला. मुंबई महापालिकेने केलेल्या सेरो सर्वेक्षणात बिगर झोपडपट्टी परिसरांमधून घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमधील सेरो सकारात्मकतेच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.
तर झोपडपट्टी परिसरांमधील टक्केवारीत घट नोंदवण्यात आली आहे. सर्वेक्षणातील निष्कर्ष १. सेरो सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार पुरुषांमध्ये ३५.०२ टक्के इतकी सेरो सकारात्मकता आढळून आली. तर महिलांमध्ये ३७.१२ टक्के इतकी सरो सकारात्मकता आढळून आली.