मुंबई-विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनेही चमकदार फलंदाजी केली. या खेळीदरम्यान विराटने आयपीएलमध्येही 6000 धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये हा आकडा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
विराटने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 6021 धावा केल्या आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने आयपीएलमध्ये पहिल्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकापर्यत फलंदाजी केली आहे. यादरम्यान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरही तो यशस्वी झाला आहे.
विराट हा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव असा खेळाडू आहे जो सर्वच्या सर्व 14 हंगाम एकाच संघासाठी म्हणजे आरसीबीसाठी खेळला आहे. विराटने आतापर्यंत 196 सामन्यांमध्ये आरसीबीचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने या 196 सामन्यांच्या 188 डावांमध्ये 38.35च्या सरासरीने 6021 धावा बनविल्या आहेत. त्यामध्ये 5 शतके व 40 अर्धशतकांचा समावेश आहे.
विराटने आपल्या आयपीएल कारकिर्दीत पहिला क्रमांकापासून ते सातव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी केली आहे. दरम्यान, त्याने सर्वाधिक 2696 धावा तिसऱ्या क्रमांकावर काढल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 1687 धावा ठोकल्या आहेत. विराट पहिल्या क्रमांकावर ही बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे.
त्या स्थानी त्याच्या बॅटमधून 801 धावा निघाल्या आहेत. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर त्याने अनुक्रमे 376 व 173 धावा बनवल्या आहेत. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 237 धावांचे योगदान दिले. तर विराटने सर्वाधिक कमी 51 धावा सातव्या क्रमांकावर खेळताना बनविल्या आहेत.