नगर -जिल्ह्यात आज 304 नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. तसेच जिल्ह्यात आज 332 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 51 हजार 250 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.22 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 740 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 104, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 28 आणि अँटिजेन चाचणीत 172 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 36, अकोले 10, कर्जत 01, कोपरगाव 01, नगर ग्रामीण 07, नेवासा 07,
पारनेर 04, राहाता 10, राहुरी 05, संगमनेर 11, शेवगाव 02, श्रीगोंदा 02, श्रीरामपूर 08 अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 14, नगर ग्रामीण 07, पाथर्डी 02, राहाता 01, राहुरी 02, संगमनेर 01, आणि श्रीरामपूर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 172 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 16,
अकोले 26, जामखेड 04, कर्जत 05, कोपरगाव 04, नगर ग्रामीण 07, नेवासा 04, पारनेर 10, पाथर्डी 35, राहाता 14, राहुरी 09, संगमनेर 14, शेवगाव 12 श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 04, कॅन्टोन्मेंट 03 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 74, अकोले 12, जामखेड 14, कर्जत 15, कोपरगाव 14, नगर ग्रा 5, नेवासा 16, पारनेर 17, पाथर्डी 51, राहाता 20, राहुरी 8, संगमनेर 38, शेवगाव 23, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 14, मिलिटरी हॉस्पिटल 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.