धक्कादायक ! डॉक्टरने पैशांअभावी शस्त्रक्रियेनंतर टाके न घालताच पाठवले घरी; चिमुकलीचा मृत्यू

प्रयागराज – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका खासगी रुग्णालयात कुटुंबीय रुग्णाच्या उपचाराची रक्कम देऊ शकले नाही, त्यामुळे डॉक्टरने मुलीला शस्त्रक्रियेनंतर टाके न देताच कुटुंबाकडे सोपवल्याचा आरोप कऱण्यात आला आहे. यामुळे तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रयागराजमधील करेली गावातील रहिवासी बह्मदीन मिश्रा यांची तीन वर्षांची मुलगी पोटाच्या विकाराने त्रस्त होती. आई-वडिलांनी मुलीला उपचारासाठी रावतपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. काही दिवसांनी मुलीच्या पोटाचे ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशनसाठी दीड लाख रुपये घेतल्यानंतर रुग्णालयाने ५ लाख रुपयांची मागणी केली. एवढी रक्कम देण्यास असमर्थ ठरल्यानंतर रुग्णालयाने कुटुंबाला बाहेर काढले आणि येथे इलाज होणार नसल्याचे सांगितले.

मुलीला घेऊन तिचे पालक अनेक रुग्णालयात गेले. मात्र कोणत्याही रुग्णलयात मुलीला उपचारासाठी भर्ती करून घेण्यात आले नाही. त्यानंतर मुलीचा प्रकृती आणखीच ढासळत गेली. यातच तिचा मृत्यू झाला. मुलीच्या वडिलांनी आरोप केला की, मुलीच्या ऑपरेशननंतर डॉक्टरांनी टाके लावले नव्हते. त्यामुळे इतर रुग्णालयांनी मुलीला भर्ती करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.