महिला अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; महिला व बालविकास विभागात खळबळ

भंडारा – एकात्मिक बाल सेवा प्रकल्पाच्या युवा बाल विकास प्रकल्प महिला अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शितल अशोक फाळके (वय-28, रा. पाडळी, ता. कोरेगाव, सातारा, सध्या रा. लाखनी) असे आत्महत्या केलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता.6) पहाटे 3.30 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी लाखनी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शितल फाळके या लाखनी येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून 2017 मध्ये रुजू झाल्या होत्या. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. त्या तणावात असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी (ता. 5) कार्यालयात त्या नाराज असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

शुक्रावारी रात्री त्यांनी आणि त्यांच्या आईने सोबत जेवन केले आणि नंतर झोपण्यासाठी गेल्या. पहाटेच्या सुमारास त्यांची आई लघुशंकेसाठी बाथरूमकडे गेल्या असता त्यांना शितल यांनी ओढणीच्या साहाय्याने गजाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी लाखनी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास लाखनी पोलीस करत आहेत. या घटनेने महिला व बाल विकास विभागत खळबळ उडाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.