पुणे – मोबाइलवर फोन करून धमकी देत पत्नीबद्दल अश्लील भाष्य करणाऱ्याला तीन महिने कारावास 500 रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांनी सुनावली. सुभाष हिरालाल भोसले (वय 28, रा. माण, ता. मुळशी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरूणाने फिर्याद दिली आहे. जून 2009 ते 31 मार्च 2010 या कालावधीत ही घटना घडली.
फिर्यादीची पत्नी आणि भोसले याची नागपूर येथील ट्रॅव्लस कंपनीच्या कार्यालया ओळख झाली होती. त्यावेळी दोघांनी एकमेकांच्या मोबाइल नंबरची देवाण घेवाण केली. त्यानंतर भोसलेने वेळोवेळी फोन करून फिर्यादी यांना पत्नीबद्दल अपशब्द वापरले.
अश्लील संदेश पाठविल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ऍड. योगेश कदम यांनी काम पाहिले. गुन्हा गंभीर असल्याने त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. कदम यांनी केली. पोलीस उपनिरीक्षक घोलप यांनी या प्रकरणाचा तपास केला. तर, पोलीस शिपाई नितीन लाड, हवालदार राहुल शिंदे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.