सर्वच दहशतवाद्यांच्या नावांची यादी आली समोर
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरविषयीचे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या सीमारेषेवर कारवाया वाढतच जात आहेत. देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी सीमेवरून देशात घुसखोरीसाठी दहशतवादी आणि पाकचे कमांडो सतत प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता काश्मीर खोऱ्यात अजूनही 273 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या सर्व दहशतवाद्यांची यादी आता उघड करण्यात आली आहे.
भारतीय सैन्याने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरूद्ध मोहीम सुरू केली आहे. अजूनही खोऱ्यात 273 दहशतवादी सक्रिय असूप या सर्वच दहशतवाद्यांची यादी आता समोर आली आहे. दक्षिण काश्मीरमध्ये सर्वाधिक 158 दहशतवादी कार्यरत आहेत. याशिवाय उत्तर काश्मीरमधील 96 आणि मध्य काश्मीरमधील 19 दहशतवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये 166 स्थानिक आणि 107 विदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. लष्कर-ए-तैयबा 112, हिज्बुल मुजाहिद्दीन 100, जैश-ए-मोहम्मद 58 आणि अल बद्र दहशतवाद्यांची संख्या सर्वाधिक आहे.