शिरूर -अण्णापूर येथे 52 वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाल्यानंतर अण्णापूर आणि शिरूर शहर या दोन्ही ठिकाणी एकूण 24 जणांना क्वारंटाइन करून ठेवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली.
अण्णापूर येथील रुग्णाच्या घरी ठाणे येथील नातेवाईक आले होते. त्यांच्यामुळे हा बाधित झाल्याचा संशय आहे. अण्णापूर गाव पूर्णपणे सील करण्यात आले असून या नागरिकांच्या संपर्कात आलेले त्याचे पाच जवळचे नातेवाईक व इतर पाच असे एकूण दहा जण क्वारंटाइन केले, तर करोना रुग्णावर शिरूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते. त्यांचा एक्स-रे एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये काढला होता.
हॉस्पिटलमधील दहाजण, डायग्नोस्टिकमधील चारजण क्वारंटाइन केले आहे. खासगी हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर दोन्ही सील केले आहे. शिरूर तलाठी विजय बेंडभर, करडे रुग्णालयाचे आरोग्य सहायक आर. व्ही. नवले, पथकाने गावची पाणी करून उपाययोजनेस सुरुवात केली आहे. जंतुनाशक फवारणीचे काम सुरू केल्याचे सरपंच दत्तात्रय कुरुंदळे यांनी
सांगितले.