सातारा – कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेले सात, सह्याद्री हॉस्पिटलमधील नऊ, खावली करोना केअर सेंटरमधील सहा व वाई करोना केअर सेंटरमधील दोन, अशा एकूण 24 जणांना दहा दिवसांच्या उपचारांनंतर शुक्रवारी घरी सोडण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेल्यांमध्ये पाटण तालुक्यातील नवसरवाडी येथील 60 वर्षांचा पुरुष, 22 व 25 वर्षे वयाचे युवक, 53 वर्षांची महिला, तामिणी येथील 25 वर्षांचा युवक, कालेवाडी येथील 21 वर्षांची महिला, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 30 वर्षांचा युवक, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्यांमध्ये कराड तालुक्यातील विंग येथील 19 वर्षांचा युवक, 43 वर्षांची महिला, वानरवाडीतील नऊ वर्षांचा मुलगा, 19 वर्षांचा युवक, सात वर्षांचा मुलगा व 70 वर्षांची वृद्ध महिला, खटाव तालुक्यातील अंभेरी येथील 29 वर्षांचा युवक, 44 वर्षांची महिला, 5 वर्षाची मुलगी, खावली करोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्यांपैकी डांभेवाडी, ता. खटाव येथील 46 वर्षांचा पुरुष, कुस ब्रुद्रुक, ता. सातारा येथील 19 वर्षांचा युवक व 23 वर्षांची महिला, फलटण तालुक्यातील सस्तेवाडीतील 21 व 64 वर्षांच्या महिला, वाघोली, ता. कोरेगाव येथील 57 वर्षांची महिला, वाई करोना केंअर सेंटरमध्ये दाखल असलेला 45 वर्षांचा पुरुष व 15 वर्षांची मुलगी यांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले.