सातारा – महाबळेश्वर तालुक्यातील माचुतर येथील 30 वर्षीय महिलेचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर शिरवळ (ता. खंडाळा) येथील 72 वर्षीय करोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिला श्वसन संस्थेचा त्रास होत होता, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी दुपारी दिली. जिल्ह्यातील विविध करोना केअर सेंटरमधील 104 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 105 जणांच्या स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 704 करोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 472 रुग्ण बरे झाले आहेत. तर 223 रुग्णांवर उपचार सुरु असून 31 जणांचा मृत्यू झाला आहे.
रात्री उशिरा सातारा शहरातील खासगी रुग्णालयात दाखल असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील माचुतर येथील 30 वर्षीय महिलेचा अहवाल करोनाबाधित आल्याचे खासगी हॉस्पिटलने कळविले आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालयात शुक्रवारी सकाळी शिरवळ (ता. खंडाळा) येथील 72 वर्षीय करोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिला श्वसन संस्थेचा त्रास होत होता, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
रात्री उशिरा पुण्यातील एनसीसीएस यांनी 81 जणांचे तर कृष्णा हॉस्पिटलमधील 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे, अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, गुरूवारी रात्री उशिरा जिल्ह्यीाल 13 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यापूर्वी सायंकाळी उरूलच्या तरूणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे गुरूवारी दिवसभरोत 14 जण पॉझिटिव्ह आले. महाबळेवर तालुक्यातील कुरोशी येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यूपश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
तसेच खटाव तालुक्यातील निढळ येथील 20 वर्षीय गरोदर स्त्रीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या 13 बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील वडले येथील 40 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, शिरवळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 30 वर्षांच्या कर्मचाऱ्याला ड्युटीवर असताना करोनाची बाधा झाली. त्याच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तेथील डॉक्टरांनी केलेल्या उपचारांमुळे आणि पोलीस दलातील अधिकारी व सहकाऱ्यांनी दिलेल्या धीरामुळे या संकटावर मात करू शकलो, अशी भावना त्या पोलीस कर्मचाऱ्याने व्यक्त केली.