उधमपूर (जम्मू आणि काश्मीर) – केंद्रीय राखीव पोलीस दलाने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रिमोट कंट्रोल्ड जॅमरसह उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे असलेले अत्याधुनिक ड्रोन तैनात केले आहेत. त्याद्वारे अमरनाथ यात्रा मार्गावरील सुरक्षा स्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
यात्रेकरूंच्या रक्षणासाठी सीआरपीएफची 137 वी बटालियन तैनात करण्यात आली असून अत्यंत समर्पित भावनेने ही बटालियन या यात्रेकरूंच्या सुरक्षेची काळजी घेईल असे या दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
केवळ ड्रोनच नव्हे तर अत्यंत आधुनिक संपर्क व परिवहन यंत्रणाहीं या दलातर्फे येथे तैनात केली जात आहे. यात्रा मार्गावर त्याद्वारे सतत 24 तास लक्ष ठेवले जाणार आहे.
1 जुलैपासून सुरू होणारी ही यात्रा मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील पहलगाम आणि बालतालमधील नुनवान या पारंपारीक मार्गांवरून सुरू होईल.