सर्वांचेच मृत्यू संशयास्पद,भारतात झाले तिघांचे मृत्यू
मॉस्को : रशियन राजकारणातील सर्वच घटना अतर्क्य आणि अनाकलनीय असतात रशीया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध सुरू झाल्यानंतर अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ताज्या माहितीनुसार, गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये रशियातील 24 श्रीमंत व्यक्तींचा मृत्यू रशिया सह जगाच्या पाठीवर कोठे ना कोठे झाला असून सर्वांचेच मृत्यू संशयास्पद आहेत यापैकी तीन लोकांचा मृत्यू भारतात झाला आहे.
भारताचा विचार करता गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये तीन रशियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी दोघांचा मृत्यू ओडीसामध्ये तर एकाचा मृत्यू पारदीप बंदरावर एका जहाजात झाला. 22 डिसेंबर 24 डिसेंबर आणि तीन जानेवारी रोजी या घटना उघडकीस आल्या या पार्श्वभूमीवर रशियन नागरिकांच्या मृत्यूबाबत जगाच्या पाठीवर इतरत्र घडणाऱ्या बातम्यांचा आढावा घेतला असता अशा प्रकारच्या मृत्यूच्या घटना इतरत्रही घडल्या आहेत.
सर्वच नागरिकांचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू झाला आहे त्यापैकी सहा लोकांचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. 5 लोकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, तर चार लोकांनी स्वतःला गोळी मारून जीवन संपवले आहे. 4 लोकांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू आला आहे तर इतर पाच जणांचा मृत्यू कसा झाला आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या कालावधीमध्ये ज्या 24 लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये अनेक लोक अब्जाधीश होते.
काही निवृत्त लष्करी अधिकारी होते काही व्यावसायिक आणि उद्योगपती होते काहीजण मोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संचालक होते यापैकी नऊ लोकांचा मृत्यू रशियातच मॉस्को आणि इतर शहरांमध्ये झाला असला तरी इतर लोकांचा मृत्यू फ्रान्स स्पेन आणि भारत या देशांमध्ये झाला आहे.
2020 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे संशयास्पद रित्या रशियन नागरिकांचा मृत्यू होण्याची मालिका उघडतील आली होती. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यामध्ये दोन कॉमन गोष्टी आढळल्या आहेत. एक तर त्यापैकी अनेक जण रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या जवळचे आहेत किंवा त्यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला विरोध केला आहे. या सर्व मृत्यूचा एकमेकांशी संबंध आहे की नाही यावर कोणताही तपास सध्या करण्यात येत नाही पण जागतिक पातळीवर या मृत्यूच्या मालिकेची चर्चा मात्र सुरू झाली आहे.