बॉलीवूडमधील ९० च्या काळातील अजय आणि काजोलची जोडी आजही प्रेक्षकांना आवडते. प्रेक्षक आजही त्यांचे चित्रपट तितक्याच आवडीने पाहतात. या काळातील प्यार तो होना ही था या चित्रपटाला आज २२ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने अजयने एक सुंदर पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
22 years in real and reel.
Pyaar To Hona Hi Tha 🌹🌹🌹🌹@itsKajolD pic.twitter.com/TKmVfRiU8h— Ajay Devgn (@ajaydevgn) July 15, 2020
अजयने ट्विटरवर या चित्रपटातील एक सीन शेअर करत काजोल सोबतीचे “रील आणि रिअल लाइफचे २२ वर्ष. प्यार तो होना ही था”, असं कॅप्शन व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटातील काही सीन दिसत असून बॅकग्राऊंडला प्यार तो होना ही था चं गाणं सुरु आहे. दरम्यान या चित्रपटातील डायलॉग आजही प्रेक्षक तेवढ्याच आवडीने बघतात. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाच्या माध्यमातून तिने पुन्हा कलाविश्वात पदार्पण केलं.