मुंबई – कोरोना विषाणूने साऱ्या जगात धुमाकुळ घातल्यानंतर आता चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घरातही शिरकाव केला आहे. बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ आणि त्यांचा मुलगा अभिनेता ‘अभिषेक बच्चन’ यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णायलमध्ये दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्याकडून उपचारांना चांगला प्रतिसाद, नानावटी रुग्णालयाची माहिती दिली आहे.
दरम्यान, अमिताभ यांनी आपआपल्या ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भातील माहिती दिली. यानंतर ट्विटवर अमिताभ यांना या आजारामधून लवकर बरं होण्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली असून अमिताभ आणि अभिषेकला गेट वेल सूनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.