328 जणांना दिवसभरात डिस्चार्ज
पुणे – शहरात मागील 24 तासांत तब्बल 22 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, मृत्युच्या एकूण संख्येने रविवारी 613 आकडा गाठला आहे. तर, रविवारी (दि.28) दिवसभरात आणखी 523 करोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 16,125वर गेली आहे.
रविवारी दिवसभरात केवळ 693 जणांचे स्वॅब घेण्यात आले. तर, शनिवारच्या स्वॅबमधील 850 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सोमवारी साधारण दीड हजार स्वॅबमधून अहवाल येणार आहेत.
दरम्यान, सद्यस्थितीत शहरात 6 हजार 65 ऍक्टिव्ह बाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यातील 324 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 54 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. दिवसभरात 328 ठणठणीत झाले असून, आतापर्यंत 9,447 व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे.