रायगड – मुंबई, ठाणे पाठोपाठ आता रायगडमध्येही करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. उरण तालुक्यात एकच कुटुंबातील 21 नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याची वाटचाल रेडझोनच्या दिशेने सुरू झाली आहे.
रायगड जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या आता 234 वर पोहोचली आहे. रविवारी करंजा गावातील एका करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना करोनाची लागण झाली आहे. 21 पैकी 15 जणांना नवी मुंबईतील एमजीएम कामोठे येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, हॉटस्पॉट असलेल्या दिवा, ठाणे येथून रत्नागिरी जिल्ह्यात चोरी छुपे मार्गे चालत येणाऱ्या 35 जणांना खेड पोलिसांनी कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असलेल्या तुळशी विन्हेरे मार्गावर ताब्यात घेतले आहे.