नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्याआधीच सुरक्षा दलांनी पाकिस्तानचा कट उधळला आहे. कुलगाममधील मिरहमा भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुलतान पठाण आणि जबिउल्लाह अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. या दहशतवाद्यांकडून दोन एके-47 रायफल, सात एके मॅगझिन आणि नऊ ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती देताना काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी, चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांदा खात्मा करण्यात आला आहे. ठार झालेले दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी असून सुलतान पठाण आणि जबिउल्लाह अशी त्यांची ओळख पटली असल्याचे म्हटले आहे. हे दहशतवादी २०१८ पासून कुलगाम-शोपियान जिल्ह्यातील भागात सक्रिय होते.
Jammu & Kashmir | An encounter has broken out in the Mirhama area of the Kulgam district. Police & Army are on job. Further details awaited: Police
— ANI (@ANI) April 23, 2022
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पुढे सांगितले की, या दहशतवाद्यांकडून आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला असून त्यात दोन एके-४७, सात एके मॅगझिन आणि नऊ ग्रेनेडचा समावेश आहे.
Jammu and Kashmir: A Pakistani terrorist of the proscribed terror outfit JeM was eliminated in an encounter that broke out in the Mirhama area of the Kulgam district. Operation in progress.
(Visual deferred by unspecified time) pic.twitter.com/Bs6Ksiyggb
— ANI (@ANI) April 23, 2022
दरम्यान, जम्मूच्या बिश्नाह जिल्ह्यातील लालियान गावात एक संशयास्पद स्फोट झाला आहे. शेताच्या मध्यभागी हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा स्फोट कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.