सीआयएसएफ जवानाचा गोळीबार; दोघांचा मृत्यू; एक जखमी

उधमपूर : सीआयएसएफ दलाच्या काश्‍मिरातील उधमपूर येथील तळावर जवानाने केलेल्या गोळीबारात दोन जवान मरण पावले. तर अन्य एक जण जखमी झाले. मंगळवारी ही घटना घडली.

उधमपूरच्या जिल्हा मुख्यालयापसून पाच किमीवरील सुई या गावात ही घटना घडली. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, छावणीत एका जवानाने झालेल्या भांडणाच्या रागातून सहकाऱ्यावर गोळी झाडली. यात जखमी झालेल्या तीनही जवानांना उधमपूर जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले.

तेथे हवालदात बीएन मुर्ती आणि महंमद तस्लीम यांना मृत घोषीत करण्यात आले. प्रथमोपचार हवालदार संजय थाळी यांना पुढील उपचारासाठी जम्मू येथे हलवण्यात आले. जखमी की मृत नेमक्‍या कोणत्या जवानाने गोळीबार केला, हे समजू शकले नाही. वरीष्ठ पोलिस अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.