कोरेगाव भीमाच्या मुलांकडून चाळीस हजारांची उलाढाल

शिक्रापूर- कोरगाव भीमा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवसायीक व चाकोरीबाहेरचे शिक्षण देण्याच्या हेतूने शालेय मुलांच्या आठवडे बाजाराचे नियोजन करून थेट शाळेत आठवडे बाजार भरवून आर्थिक उलाढाल केली. मुलांनी आठवडे बाजारातून तब्बल चाळीस हजारांची उलाढाल केली आहे. यावेळी बाजारात दोनशे बारा विद्यार्थ्यांनी विविध फळे, भाज्या, कडधान्ये विक्रीसाठी ठेवले होते.

विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते. बाजाराचे उद्‌घाटन सरपंच संगीता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे, रमेश शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्या मीना ढेरंगे, ग्राहक पंचायतीचे जिल्हा कोषाध्यक्ष भानुदास सरडे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ राऊत, उपाध्यक्षा संध्या शिंदे, सदस्य कचरु बवले, सुनील ढेरंगे, काळुराम गोसावी, बालाजी मेटे, ज्योती कांचन, दमयंती कांचन, आरिफा पठाण, शाहिन इब्राहिमपुरे, आरती जाधव, केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर उपस्थित होते. नियोजन मुख्याध्यापिका कुसुम बांदल व शिक्षकांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.