शिरूर भाजपच्या तालुकाध्यक्षपदी दादा पाटील फराटे

मांडवगण फराटा- शिरूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी दादा पाटील फराटे यांची नुकतीच निवड करण्यात आली. यासंदर्भात निवडीचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिले आहे. दादा पाटील फराटे हे गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे काम करत आहेत. फराटे यांनी मांडवगण फराटा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे. रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. मागील 5 वर्षांपासून त्यांनी भाजपच्या किसान मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. शिरूर अध्यक्षपदासाठी नुकत्याच मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. शिरूर तालुका भारतीय जनता पक्षात ते ज्येष्ठ व अनुभवी आहेत. सातत्याने त्यांनी विविध उपक्रमही राबवले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पक्षाच्या वतीने त्यांची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली. पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणार असून आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यावर विशेष भर देणार असल्याचे फराटे यांनी निवडीनंतर सांगितले. निवडीवेळी जिल्हा संघटन सरचिटणीस सचिन सदावर्ते, सरचिटणीस तानाजी दिवेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, संपर्कप्रमुख धर्मेंद्र खांडरे, दादासाहेब सातव, अविनाश बवरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वैजयंती चव्हाण, बाळासाहेब गरूड, राजेंद्र गदादे, आबासाहेब सोनवणे, श्‍याम गावडे, संजय पाचंगे, गोरक्ष काळे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.