PM Modi in Udhampur । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरात प्रचार सुरू केलाय. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज प्रचारासाठी उधमपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केलीय. यावेळी त्यांनी लवकरच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार असल्याचे म्हटले आहे. तसेच केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका देखील लवकरात लवकर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. उधमपूरमधून भाजपने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना उमेदवारी दिलीय. त्यांच्याच प्रचारासाठी पंतप्रधान उधमपूरमध्ये दाखल झालेत.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात, काँग्रेसने शाहपूर कंडी धरण 10 वर्षे प्रलंबित ठेवले. त्यामुळे जम्मूतील गावे कोरडी पडली होती. काँग्रेसच्या काळात रावीतून बाहेर पडणारे आमच्या हक्काचे पाणी पाकिस्तानात जात होते. जेव्हा लोकांना त्यांचे सत्य कळले, तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसचं खरी बाजू लोकांसमोर आली.
जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार PM Modi in Udhampur ।
पुढे ते म्हणाले, “10 वर्षात आम्ही दहशतवादी आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता येत्या 5 वर्षांत या राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. गेल्या 10 वर्षांत जम्मू-काश्मीर पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळेच आता आगामी काही दिवसात जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार असल्याची मोठी घोषणा त्यानी केली. यासोबतच केंद्रशासित प्रदेशात लवकरच विधासभा निवडणूक देखील पार पडणार आहे. असे ते म्हणाले.
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सवर निशाणा PM Modi in Udhampur ।
जम्मू-काश्मीरमध्ये आता शाळा जाळल्या जात नाहीत, त्या बांधल्या जातात, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले आहे. त्यांनी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सवर घराणेशाहीचा आरोप करत दोन्ही पक्ष घराणेशाही असल्याचे सांगितले. कलम 370 बाबत पंतप्रधान म्हणाले, “तुमच्या आशीर्वादाने मोदींनी 370 चा ढिगारा जमिनीत गाडला आहे. मी काँग्रेसला 370 परत आणण्याचे आव्हान देतो. जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेसाठी 370 ची भिंत बांधण्यात आली.”असे म्हणत त्यांनी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सवर निशाणा साधला.
मजबूत सरकार बनवण्याची ही निवडणूक
ही निवडणूक म्हणजे देशात मजबूत सरकार बनवण्याची निवडणूक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आज गरिबांना मोफत रेशनची हमी आहे. 10 वर्षांपूर्वी काश्मीरमधील गावांमध्ये वीज, पाणी आणि रस्ते नव्हते. मोदींची हमी म्हणजे हमीभावाच्या पूर्ततेची हमी. आज तुमच्या आशीर्वादाने मोदींनी आपली हमी पूर्ण केली,असे त्यांनी म्हटले.