मुंबई – बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या हॉट लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियांकाने अलीकडेच मेट गाला 2023 मध्ये स्टायलिश अंदाजात एंट्री केली. तिने पती निक जोनाससोबत मॅचिंग ब्लॅक अँड व्हाइट लूक कॅरी केला होता. प्रियांकाने हाय स्लिट ड्रेस घातला होता आणि निकने टक्सिडो घातला होता. दोघांच्या आउटफिट्ससोबतच सर्वांच्या नजरा तिच्या नेकलेसवर खिळल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांकाच्या या नेकलेसची किंमत 2 अब्ज आहे.
प्रियंका चोप्राने परिधान केलेल्या नेकलेसची किंमत 2 अब्ज आहे. हा नेकलेस 11.6 कॅरेट हिऱ्याचा आहे, ज्याची रचना बुल्गारीने केली आहे. इव्हेंटनंतर प्रियांकाच्या या नेकपीसचा लिलाव होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशात तिचा २ अब्जांचा नेकलेस कोण आणि किती दराने विकत घेते हे पाहणे रंजक ठरणार आहे. प्रियांकाच्या आउटफिटबद्दल सांगायचे तर, हे व्हॅलेंटिनोने डिझाइन केले आहे, ज्यामध्ये अभिनेत्री खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसत आहे.