उत्तर प्रदेश – सध्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी या निवडणूकीसाठी कंबर कसली आहे. अनेक नेते सध्या कर्नाटकमध्ये प्रचारासाठी येत आहे. काही दिवसांपूर्वी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विषारी साप असा केला होता. यावरून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांचा अपमान हा देशाचा अपमान असल्याचे म्हंटले होते. यावर कॉमेडिनयन राजीव निगन याने पलटवार केला आहे.
राजीव निगान कर्नाटकातील कलबुर्गी येथे एका जाहीर सभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी मोदींवर टिप्पणी केली. हे या वयात खर्गेजींना हे शोभतं का? यावरून काँग्रेसचा पराभव होत असून त्यांच्या मुलाचे डिपॉझिट जप्त होत असल्याचे दिसून येते. पंतप्रधानांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. ते भारताचा अपमान करतात. ते भारतातील 140 कोटी जनतेचा अपमान करतात. भारताचा अपमान करणाऱ्या कोणालाही आपण स्वीकारू नये. मोदींचा अपमान सहन केला जाणार नाही. त्यांच्यावर टीका कुणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी लागेल.”
राजीव निगन म्हणाला होता की, “यापूर्वी कधीही पंतप्रधानांचा अपमान झाला नाही का? त्यावेळी कुणीच काही बोललेलं नाही. 2014 पूर्वी कधीही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या नाहीत का, 2014 नंतर वेगळे राष्ट्र आता अस्तित्वात आले आहे. हेच लोक पूर्वी पंतप्रधानांप्रती ज्या भावना व्यक्त करायचे ते कसे होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.”
प्रधानमंत्री का अपमान, राष्ट्र का अपमान होता है… pic.twitter.com/uhRE37Zgm9
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 30, 2023
काय म्हणाले होते मल्लिकार्जून खर्गे ?
कर्नाटकातील एका सभेत ‘मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्याला विष समजा अगर नका समजू परंतु ते चाखलं तर मरुन जाल’ असे विधान खर्गे यांनी केलं होतं. मात्र यावर त्यांनी स्पष्टीकरण देत म्हंटले होते की, ‘मी त्यांच्याबद्दल (पंतप्रधान मोदी) हे विधान केलं नाही. मी व्यक्तिगत वक्तव्य करीत नाही. त्यांची विचारधारा सापासारखी आहे, असं मला म्हणायचं होतं. जर तुम्ही विष चाखलं तर मृत्यू होणार, असं मला म्हणायचं होतं.’