बंगळुरू – भारतात बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, तमिळनाडूतील तिरूवल्लूर जिल्ह्यात अशीच एक घटना उघडकीस आलीय. मात्र, यावेळी चाकूचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्याचाच तरूणीने खून केलाय.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरूवल्लुर येथील एक तरूणी आपल्या नातेवाईकाकडे शोलावरम येथे आली होती. संध्याकाळच्या वेळी ती शौचासाठी घराजवळील शेतात गेली असता, अजित ऊर्फ किल्ली याने तीला अडवले. चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असताना तरूणीने त्याला ढकलले.
स्वत:चा बचाव करण्यासाठी तरूणीने अजीतच्या हातातील चाकू हिसकावून घेत त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर सपासप वार करून त्याचा खून केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. तरूणीचीही चौकशी करण्यात येत असून घटनेवेळी आणखी कोणी उपस्थित होते का? याचा तपास सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.