सातारा – जिल्ह्यात लंपी स्किनमुळे शुक्रवारी 19 जनावरांचा मृत्यू झाला असून आजअखेर 285 पशुधन मृत झाले आहे. महाबळेश्वर वगळता 10 तालुक्यांतील 148 गावांमध्ये लंपी स्किनची लागण झाली आहे. आजअखेर 4 हजार 485 जनावरांना लंपीचा प्रादुर्भाव झालो. 1705 जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
लंपी स्किनच्या उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे, शासकीय पशुवैद्यकीय आणि तालुका लघु पशुचिकित्सालायांमध्ये उपलब्ध आहेत. जिल्हयातील गोवर्गीय पशुधनाची संख्या 3 लाख 52 हजार 436 असून आजअखेर 3 लाख 47 हजार 100 पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी 98.50 टक्के आहे, अशी माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.