पुणे – वानवडी परिसरात राहणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेशी फेसबुकवर ऑनलाइन ओळख करुन तिला गिफ्ट पाठविण्याचे भासवुन ते कस्टम विभागाने पडल्याचे कारण सांगत तिची १८ लाख १२ हजार रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी वानवडी पाेलीस ठाण्यात अज्ञात आराेपी विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित महिलेची फेसबुकवर परदेशातील एका व्यक्तीशी ओळख झाली. तिचा विश्वास संपादन करुन तिला गिफ्ट पाठविले असल्याचा बहाणा करुन त्या गिफ्टमध्ये पैसे असल्याचे भासवले. ते गिफ्ट साेडठविण्यासाठी कस्टम डयुटीसाठी मनिष गुप्ता याचे युटीबीआय बँक खाते व रंजनकर यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया खाते यावर एकूण १८ लाख १२ हजार रुपये पाठविण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत वानवडी पाेलीस पुढील तपास करत आहे.