पुणे – ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तडीपार गुंड आणि सराईत गुन्हेगार यांचे कडून 3 गावठी पिस्तुल सह 2 जिवंत काडतुसे जप्त केली. रोहित विजय अवचरे ( 24 रा लक्ष्मी नगर शाहू वसाहत पर्वती , पुणे) आणि आदित्य सोपान साठे ( 26 रा जनता वसाहत पर्वती पायथा पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
तडीपार गुंडासह दोघांकडून तीन गावठी पिस्तूले हस्तगत pic.twitter.com/7f1sY3cDoX
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) July 21, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 20 जूलै रोजी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकास राजगड पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खबर मिळाली 2 व्यक्ती शस्त्र घेऊन एक काळ्या रंगाचे ऍक्टिवा गाडी वरून कोंढाणपूर फाटा ब्रिज जवळ येणार असल्याचे समजले त्यावरून त्या ठिकाणी सदर पथकाद्वारे सापळा रचून काळ्या रंगाच्या ऍक्टिवा गाडी वरून येणाऱ्या 2 इसमाना ताब्यात घेऊन अंगजडती घेतली.
दोन्ही सराईत यांच्या कम्बरेला प्रत्येकी एक गावठी बनावटीचे पिस्तुल मिळून आले तसेच त्यांचे कडील गाडीची डिकी चेक केली असता त्यामध्ये एक गावठी पिस्तुल असे एकूण 3 गावठी पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आली. आरोपींची आणखीन माहिती घेतली रोहित विजय अवचरे हा पुणे जिल्ह्यातील तडीपार गुंड असून आज पर्यत त्याची तडीपार मुदत संपलेली नसल्याचे समजले. त्यांच्याकडून एकूण 1 लाख 55 हजार 200 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई आणि तपास करणे करीत आरोपी मुद्देमाल सह राजगड पोलिस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहेत.