राजगुरूनगरात 179 किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

नगरपरिषद अधिकाऱ्यांकडून दुकानदारांवर धडक कारवाई

राजगुरूनगर (प्रतिनिधी) – राजगुरूनगर नगर परिषद हद्दीत असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या विकणाऱ्या दुकानातून अधिकाऱ्यांनी 179 किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त केल्या आहेत.

राजगुरूनगर शहरात “माझं राजगुरूनगर स्वच्छ राजगुरूनगर’ हे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सोमवारी (दि.17) पिशव्या जप्त केल्या. नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, स्वच्छता सभापती संपदा सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

याप्रसंगी आरोग्य अधिकारी चारुबाला हरडे, वाहन प्रमुख तुकाराम पाटील, लिपिक विद्या वराडी, शहर समन्वयक सतीश कांबळे, मुकादम कैलास सांडभोर, हमराज माने, प्रवीण देशमुख, राजगुरूनगर पोलीस ठाण्याचे भाऊसाहेब जोशी, संदीप कारभळ व कारपे प्रतिनिधी जितेंद्र भाले, राहुल निकम, मल्हारी पंडित, रेश्‍मा ढावरे, पूजा पिंगळे उपस्थित होते. जुना मोटर स्टॅंड, पाबळ रस्त्यावरील 25, 75, असे 100 हून अधिक, जुना बसस्थानकवरील 158 दुकानांमध्ये मोहीम राबविली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.