शिराळा (प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यात आज मनपा क्षेत्रात 117 नवीन रुग्ण, शहरी भागामध्ये 9, ग्रामीण विभागात 42 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्याची रुग्णसंख्या 3916 वर पोहोचली आहे. बरे झालेली रुग्णसंख्या 1677 आहे. तर उपचाराखाली 2121 रुग्ण आहेत. तसेच जिल्ह्यातील 118 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे.
मनपा क्षेत्रातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाअखेर ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 1278, शहरी भागातील 272, मनपा क्षेत्रातील 2366 अशी आहे. आरटीपीसी टेस्ट 1097 घेण्यात आल्यापैकी 132 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. 439 अँटीजेन टेस्टपैकी 48 पॉझिटिव्ह आले.
पाच मृतांमध्ये कोरेगाव येथील 52 वर्षांचा पुरुष, नळभाग येथील 64 वर्षांचा पुरुष, कोकळे येथील 60 वर्षांचा पुरुष, नागाव येथील 80 वर्षांचा पुरुष, वाळवा येथील 66 वर्षांची महिला यांचा समावेश आहे.