बाईक लव्हरसाठी खास आकर्षण असणारी करीजमा बाईक आजही रस्त्यावरून चालली तरी अनेक जण मागे वळून पाहतात.करीजमा ही एकेकाळी देशातील सर्वाधिक लोकप्रिय बाइक होती, मात्र तीन वर्षांपूर्वी ती बंद करण्यात आली होती. आता कंपनीने करीजमा ब्रँडला यशस्वी करण्यासाठी अनेक बदलांसह एक नवीन मॉडेल लॉंच केले आहे.
हिरो मोटो कॉर्पने भारतात नवीन लॉंच केलेल्या Karizma XMR ची किंमत 1 लाख 72 हजारांपर्यंत घोषित केली आहे. तब्बल वीस वर्षानंतर कंपनीने करीजमाचे अपडेटेड व्हर्जन बाजारात आणले आहे. जाणून घेऊयात यामध्ये नेमकं काय काय खास देण्यात आलं आहे.
6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
या बाईकमध्ये स्लिप आणि असिस्ट क्लच आहे त्याचे इंजिन बाईकच्या मागील चाकांना देखील पॉवर पाठवते. हे स्टील ट्रेलीस फ्रेम सेटअपवर बांधले गेले आहे, ज्याच्या समोर टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागील बाजूस मोनोशॉक आहे.
हिरो करीजमा XMR मध्ये 17 इंची अलॉय व्हील्स आहेत, तर ब्रेकिंगसाठी दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल ABS देण्यात आले आहेत. नवीन करिझ्मा ही पूर्णपणे अपडेड बाईक आहे. म्हणूनच ती जुन्या मॉडेल्सपेक्षा वेगळी दिसते.
डिजिटल बाईक
नवीन करीजमाच्या बाजूला एक फेअरिंग आहे ज्यावर XMR आणि 210 ही अक्षरे लिहिली आहेत, जी बाईकची ओळख आहे. यात मस्क्यूलर फ्युएल टँक आणि स्प्लिट सीट सेटअप, लाइटवेट क्लिप-ऑन हँडलबार, जाड एक्झॉस्ट, पातळ मागील एलईडी लाइटिंग आहे.हिरो करीजमा XMR 210 ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येते. हे टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारख्या वैशिष्ट्यांना चालविण्यात मदत करते. आयकॉनिक यलो, टर्बो रेड आणि मॅट फँटम ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हिरो करीजमा XMR ची टक्कर भारतीय बाजारपेठेत Yamaha R15 V4, Suzuki Gixxer SF 250, आणि Bajaj Pulsar RS 200 शी असणार आहे. आता नवीन Hero करीजमा XMR भारतीय ग्राहकांना कितपत आवडते हे आगामी काही काळातच पाहायला मिळेल.