जकार्ता – इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटाजवळ प्रवासी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान 15 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 19 जण बेपत्ता झाले आहेत.
ही बोट सुलावेसी प्रांतातील बटन सेंट्रल भागामधून लॅगी गावाकडे जात असताना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बटन प्रांतातील मदत आणि बचाव पथकाकडून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जातो आहे, असे बचाव पथकाचे प्रमुख मुहम्मद अराफाह यांनी सांगितले.
या लाकडी बोटीमध्ये केवळ 20 प्रवाशांची क्षमता असताना 40 जण प्रवास करत होते. यापैकी केवळ 6 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 15 जणांचे मृतदेह सापडले असून अजून 19 जण बेपत्ता आहेत.