नवी दिल्ली – डिसेंबर 2022 मध्ये देशाचे सकल वस्तू आणि सेवा कर संकलन 1,49,507 कोटी रुपये झाले असून त्यामध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर संकलन 26,711 कोटी रुपये आणि राज्य वस्तू आणि सेवा करातून मिळालेल्या 33,357 कोटी रुपयांचा समावेश आहे. याशिवाय एकात्मिक वस्तू आणि सेवा कर 78,434 कोटी रुपये आणि वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या रु. 850 कोटींसह 11,005 कोटी रुपये अधिभारातून मिळालेला महसूल यांचा समावेश आहे.
सरकारने नियमित तडजोडीचा भाग म्हणून अधिभारातून केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 36,669 कोटी रुपये आणि राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 31,094 कोटी रुपयांची तडजोड केली आहे. डिसेंबर 2022 साठी नियमित तडजोडीनंतर केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल केंद्रीय वस्तू आणि सेवा करासाठी 63,380 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 64,451 कोटी रुपये इतका आहे.
डिसेंबर 2022 मधील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 15% नी जास्त आहे. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 8% नी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत 18% नी जास्त आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये 7.9 कोटी ई-वे बिल तयार झाली, ऑक्टोबर 2022 मध्ये तयार झालेल्या 7.6 कोटी ई-वे बिलांहून ही संख्या लक्षणीयरित्या जास्त आहे.