बीजिंग – 28 वर्षांपूर्वी सापडलेल्या कबरीच्या अवशेषांमधून 1400 वर्षे जुना डीएनए काढण्यात आला, त्यानंतर चिनी सम्राटाचा चेहरा तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे पुरातत्वशास्त्रज्ञांना कबरीमध्ये एक कवटी सापडली होती ज्याचा डीएनए शास्त्रज्ञांनी अभ्यासला होता.
सहाव्या शतकातील चिनी सम्राटाचा चेहरा त्याच्या अवशेषांमधून सापडलेल्या प्राचीन डीएनएचा वापर करून पुन्हा तयार करण्यात पुरातत्व तज्ज्ञांना यश आले आहे. या सम्राटाबद्दल असे म्हटले जाते की सम्राट वू हे चीनच्या उत्तर झोऊ राजवंशाचे शासक होते, ज्याने प्राचीन चीनच्या उत्तरेकडील भागांना एकत्र केले.
पुरातत्वशास्त्रज्ञांना 1996 मध्ये उत्तर-पश्चिम चीनमध्ये एक थडगे सापडले. करंट बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, संशोधकांनी अवशेषांमधून अनुवांशिक सामग्री मिळवली, ज्यामध्ये संपूर्ण कवटीचा समावेश होता.
तज्ञांनी सम्राटाचे स्वरूप, आरोग्य आणि वंशावळीबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, तोशियानबेई नावाच्या भटक्या समूहाचा सम्राट होता आणि तो सध्याच्या उत्तर आणि उत्तर-पूर्व चीन तसेच मंगोलियाच्या भागात राहत होता.यानंतर, तज्ञांनी या थडग्यातून मिळवलेल्या डीएनएचे जीनोम सिक्वेन्सिंग केले आणि या शासकाचे केस काळे, तपकिरी डोळे आणि त्वचेचा रंग गडद असल्याचे उघड झाले.या अभ्यासात, त्यांना आढळले की सम्राट वू चे पूर्व आणि ईशान्य आशियाई चेहर्याचे वैशिष्ट्य होते.
पुरातत्वशास्त्रज्ञ सम्राटाच्या मृत्यूचे कारण देखील शोधत असून अभ्यासात स्पष्टपणे नमूद केले आहे की वयाच्या 36 व्या वर्षी त्यांचे अचानक निधन झाले. त्याच्या मृत्यूचे कारण माहीत झाल्यास, त्याचा मृत्यू आजारपणाने झाला होता की खून झाला होता याचे गूढ उकलण्यास इतिहासकारांना मदत होईल, कारण काही ऐतिहासिक पुस्तकांमध्ये या दोन्ही गोष्टींचा उल्लेख आहे.संशोधक अद्याप सम्राटाच्या मृत्यूचे नेमके कारण निश्चितपणे ठरवू शकले नाहीत, परंतु त्यांना अजूनही वाटते की स्ट्रोकची शक्यता असू शकते. काही काळापासून पुरातत्वशास्त्रज्ञ प्राचीन डीएनए तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहेत. याद्वारे ते हाडे, दात, जुन्या वस्तू आणि गुहांतील धूळ यांच्यापासून अत्यंत उपयुक्त माहिती मिळवण्यात यशस्वी होत आहेत.