Archana Patil Chakurkar join BJP| लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे नेते शिवराज पाटील यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील अनेक दिवसांपासून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती.
आज अखेर त्यांनी जाहीररित्या भाजपमध्ये प्रवेश करत चर्चांना पूर्णविराम दिला. आज भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होत आहे.
काल डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आज शनिवारी डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना राज्यसभेचे खासदारकीचे तिकीट देण्यात आले.
🕛 12.10pm | 30-03-2024 📍 Mumbai | दु. १२.१० वा | ३०-०३-२०२४ 📍 मुंबई.
LIVE from BJP Maharashtra HQ | Mumbai@BJP4Maharashtra @cbawankule#BJP #BJP4Maharashtra #Maharashtra #Mumbai https://t.co/dJu9UmvDef
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 30, 2024
चव्हाण यांच्या प्रवेशानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवाजी पाटील चाकूरकर यांचे पूत्र माजी आमदार बसवराज पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर आता अर्चना पाटील चाकूरकर यांना देखील भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे.
हेही वाचा: