पुणे – मध्य रेल्वे प्रशासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन. मुंबईमधील दादर येथील चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठा जनसागर उसळतो. या पार्श्वभूमीवर मुंबईत येणार्या अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष १४ विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष
1. गाडी क्रमांक 01262 नागपूरहून 4 डिसेंबर रोजी रात्री 11.55 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 01264 नागपूरहून 5 डिसेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
3. गाडी क्रमांक 01266 नागपूरहून 5 डिसेंबर रोजी नागपूरहून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी सकाळी 10.55 वाजता पोहोचेल.
थांबे: अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर.
मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर अनारक्षित विशेष
1. गाडी क्रमांक 01249 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.45 वाजता सुटेल आणि अजनीला दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 01251 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल.
3. गाडी क्रमांक 01253 दादर येथून 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री 00.40 वाजता (6/7 रोजी मध्यरात्री) सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.55 वाजता अजनीला पोहोचेल.
4. गाडी क्रमांक 01255 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 7 डिसेंबर रोजी दुपारी 12.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता नागपूरला पोहोचेल.
5. गाडी क्रमांक 01257 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.10 वाजता नागपूरला पोहोचेल.
6. गाडी क्रमांक 01259 दादर 7 डिसेंबर रोजी (7/8 च्या मध्यरात्री) 00.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.55 वाजता अजनीला पोहोचेल.
थांबे: दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी.
कलबुर्गी-मुंबई अनारक्षित विशेष
1. ट्रेन क्रमांक 01245 कलबुर्गी येथून 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
2. ट्रेन क्रमांक 01246 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 7 डिसेंबर रोजी (6/7 च्या मध्यरात्री) 00.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 11.30 वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल.
थांबे: गंगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर.
सोलापूर-मुंबई अनारक्षित विशेष
1. ट्रेन क्रमांक 01247 सोलापूरहून 5 डिसेंबर रोजी रात्री 11.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
2. ट्रेन क्रमांक 01248 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 7 डिसेंबर रोजी (6/7 च्या मध्यरात्री) 00.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 09.00 वाजता सोलापूरला पोहोचेल.
थांबे: कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर.
अजनी-मुंबई वन-वे सुपरफास्ट अनारक्षित विशेष
सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्रमांक 02040 अजनी येथून 7 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर