ऑकलंड – टी-20 मालिकेतील सातत्य आता एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही राखण्यासाठी शिखऱ धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज झाला आहे. यजमान न्यूझीलंडविरुद्धची तीन टी-20 सामन्यांची मालिका जिंकल्यावर आता ( New Zealand vs India ) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघालाच संभाव्य विजेता मानले जात आहे.
विराट कोहलीने मुंबईत एक अपार्टमेंट भाड्याने घेतले, महिन्याचं भाडं ऐकून दाताखाली बोटं चावालं!
टी-20 संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या तसेच अनुभवी खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती दिली गेली असल्याने संघात नवोदितांना जास्तीत जास्त संधी मिळेल असे संकेत कर्णधार धवनने दिले आहेत. संघाची फलंदाजी जास्त भक्कम दिसत असली तरीही सलामी व चौथ्या आणि पाचव्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी दीपक हुडा, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, दीपक चहर यांनाच जबाबदारी पेलावी लागणार आहे.
त्यातच चहर खूप काळानंतर संघात परतत असल्याने त्याच्यावर दडपण राहील. तसेच पंतही सातत्याने संधी देऊनही अपयशी ठरत असल्याने हुडा व ठाकूर यांनाच प्रमुख भार वाहावा लागणार आहे. सलामीला कर्णधार धवनसह शुभमन गिल डावाची सुरुवात करेल. त्यानंतर प्रचंड भरात असलेला सूर्यकुमार यादवही एकदिवसीय संघातील आपले स्थान आणखी बळकट करण्यासाठी सज्ज आहे.
विराट कोहलीने मुंबईत एक अपार्टमेंट भाड्याने घेतले, महिन्याचं भाडं ऐकून दाताखाली बोटं चावालं!
गोलंदाजीचा विचार केला तर ठाकूर व चहर यांच्या जोडीला अर्शदीप सिंग आहेच. मात्र, नवोदित उमरान मलिक, कुलदीप सेन यांनाही संधीचे सोने करण्याची नामी संधी मिळाली आहे. फिरकीची मदार यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्यावरच राहणार आहे. येथील ईडन पार्क मैदानाचा इतिहास पाहता वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळणार असली तरीही चेंडू जुना झाल्यावर फिरकी गोलंदाजही वर्चस्व राखतील.
संजू सॅमसनला संधी देणार का ?
महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा व टी-20 संघाचा नवा कर्णधार हार्दिक पंड्या यांनी सातत्याने दुर्लक्ष केलेल्या यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला धवन तरी संधी देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सॅमसनने आयपीएल स्पर्धेत सातत्याने धावा केल्यावरही त्याचे संघातील स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. त्याच्या जागी वारंवार अपयशी ठरूरनही पंतलाच संधी दिली जाते. त्यातच आता बीसीसीआयने निवड समितालाच डच्चू दिल्यामुळे संघ व्यवस्थापन व कर्णधार धवन यांच्याच निर्णयावर सॅमसनची कारकीर्द ठरणार आहे.
उद्या पहिला एकदिवसीय सामना
ठिकाण ः ईडन पार्क, ऑकलंड
वेळ ः सकाळी 7 पासून
थेट प्रक्षेपण ः अमेझॉन प्राईम, खासगी डीटूएच ऑपरेटर