मुंबई : सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या 25 सहकाऱ्यांनादेखील न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान रविकांत तुपकरांनी तुरुगांतही अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे. मागील दोन दिवसांपासून तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर परिस्थिती आणखी चिघळेल म्हणून पोलिसांनी तुपकरांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. रविकांत तुपकरांना बुलढाण्याहून अकोला कारागृहात हलवण्यात आले आहे. अकोला कारागृहात तुपकरांसह 25 सहकाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
रविकांत तुपकरांनी दोन दिवसांपासून जेवण केलेले नाही, त्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी रविकांत तुपकरांनी कापूस, सोयाबीन आणि पीकविम्याच्या प्रश्नांवरुन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांकडून तुपकर यांचा शोध सुरु होता. आंदोलनाचा इशारा देऊन तुपकर भूमिगत झाले होते. शनिवारी तुपकर येण्याआधीच शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले होते. तुपकर पोलीसी वेशात येताच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा गदारोळ झाला आणि पोलिसांची धावपळ उडाली.