शिरूर -शिरूर तालुक्यातील सहा गावात आज दिवसभरात 13 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 17 जणांचे करोना तपासणीकरिता नमुने पाठवण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.
शिरूर तालुक्यात करोना संसर्ग रोजच वाढताना दिसत असून प्रशासन आता सतर्क झाले आहे. पुणे शहर व इतर भागात वाढत्या रुग्णांसाठी जागा कमी पडत असल्याने यापुढील काळात आता बाधित नागरिकांना घरी उपचार करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे.
शिरूर तालुक्यातील कोरेगाव-भीमा 5, रांजणगाव गणपती 3, पिंपळे धुमाळ 1, केंदूर 1, पाबळ 1, सणसवाडी 2 करोना बाधित रुग्ण आढळले आहेत.