मुंबई- जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच करोना महामारीच्या संकट काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणारे आणखी 278 पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे राज्यात 71 पोलिसांना जीव गमावावा लागला आहे.
राज्यात मागील 48 तासांत तब्बल 278 पोलिसांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राज्यील एकूण करोनाबाधितांचा आकडा 5 हजार 713वर पोहोचला आहे. यातील 4 हजार 531 जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर सध्या राज्यात 1 हजार 113 पोलीसांवर उपचार सुरू आहेत.
याचबरोबर मागील 24 तासांत इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाचे आणखी 17 जवान करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या 166 जवानांवर उपाचार सुरू असून, आतापर्यंत 282 जवानांनी करोनावर मात केली आहे.