पुणे – सिंहगड रस्ता परिसरात 13 दिवसांच्या मुलाचा मृतदेह खड्ड्यात गाडलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी संबंधीत मुलाच्या पालकांची चौकशी सुरु केली आहे. हा मुलगा दिव्यांग असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
सिंहगड महाविद्यालय परिसरातील गोदावरी हॉस्टेलच्या पाठिमागे मुलाला खड्डा करून गाडले होते. पोलिसांना एका खबऱ्यामार्फत ही माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदारांच्या परवानगीनंतर खड्डा खणण्यात आला.
हा 13 दिवसांचा मुलगा दिव्यांग असल्याने त्याच्या पालकांनी त्याला दत्तक देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला कोणीही दत्तक घेत नसल्याने त्यांनी त्याला खड्डा गाडले.
त्याला मृत झाल्यावर गाडले का त्यानंतर त्याचा मृत्यू झाला याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, त्याच्या पालकांबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली आहे.