मांडवगण फराटा -येथील रुग्णाच्या संपर्कातील 12 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली आहे. गुरुवारी (दि. 4) सायंकाळी मिळालेल्या अहवालानुसार रुग्णाच्या कुटुंबातील नऊजणांसह 12 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मांडवगण फराटा गावाला मोठा दिलासा मिळाला आहे.
अहवाल तपासणीसाठी पाठवल्यापासून गावातील नागरिकांमध्ये मोठी धाकधूक होती. मंगळवारी 12 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते; परंतु अहवाल येणे बाकी होते. 12 जणांचे अहवाल आज निगेटिव्ह आले आहे. यामुळे नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. तरी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.