“यूरिक ऍसिड’ वाढले, असे सहजपणे म्हटले जाते. यूरिक ऍसिड म्हणजे नेमके काय? कशाने वाढते, काय खावे, जेणे करून नियंत्रणात राहील. यूरिक ऍसिडचा त्रास अलिकडे अनेकांना होताना दिसतो. यूरिक ऍसिड वाढल्यानंतर शरीरात गाठीसारखे जमा होण्यास सुरुवात होते आणि वेगाने शरीरातील इतर भागात पसरते.
1.काय खावे – यूरिक ऍसिडच्या त्रासामध्ये न खाण्याच्या पदार्थांची यादी मोठी आहे. हळदीचा उपयोग अधिक फायदेशीर आहे. विविध भाज्यांमध्ये हळदीचं प्रमाण वाढवावे. हळद आणि आल्याचं सेवन जास्त करावे. उडीदडाळ, राजमा, वाल, वटाणा यांचे सेवन यूरिक ऍसिड वाढवते.
2.पालक, चुका, अंबाडी, मेथीची भाजी, करडई या पालेभाज्या त्रास वाढवतात. तांदूळका, चाकवत, लाल माठ, शेवगा पाने, पुनर्नवा उपयुक्त ठरतात. गुळवेल पानांची भाजी खाल्याने यूरिक ऍसिडचा त्रास कमी होतो.
3.साबुदाणा, भगर, दही हे पदार्थ टाळावे.
4.बाजारातील हवाबंद डब्यातील किंवा पाकिटातील पदार्थही टाळावेत.
5.थंड पदार्थ, आईक्रीमचे सेवन करू नये.
6.मासांहार – उकडलेली अंडी, खेकडे, झिंगे, मटण हे पदार्थ टाळावेत. मासांहार पदार्थामध्ये खोबऱ्याचा वापर करावा. भाजलेले मांस, मासे, तंदूर खाल्यास फायदा होतो.
7.दह्याचे सेवन करू नये. सर्व प्रकारच्या कोशिंबीर, रायते, दही घालून केलेल्या भाज्यांमुळे यूरिक ऍसिडचा त्रास वाढतो. मैद्याचे तळलेले पदार्थांचे सेवन टाळावे.
काय करावं
1.यूरिक ऍसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दिवसा झोपू नये. 2.अर्धा लिंबू 1 ग्लास पाण्यात घ्यावं. 3.व्हिटॅमिन सी असलेले फळं म्हणजे पेरू, आवळा, संत्रा, लिंबू, किवी रोज 1 फळ घ्यावे. 4.सकाळी धने व जिरं घालून 2 ते 3लिटर पाणी उकळावं आणि नंतर ते गाळून दिवसभर सेवन केल्यास त्रास कमी होतो.
डॉ. आदिती पानसंबळ आहारतज्ज्ञ, नगर. संपर्क : 7385728886.