सातारा – जिल्ह्यातील आणखी १८ जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५९७ झाली आहे.जिल्हयातील अठरा जणांचे रिपोर्ट करोनाबाधित आले आहेत. यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या गुरसाळे गावठाण (ता. खटाव) येथील ७५ वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यू झाला होता. या पुरुषाचा मृत्यूपश्चात रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या १८ बाधित रुग्णांमध्ये खटाव तालुक्यातील साठेवाडी येथील ७६ वर्षीय महिला, गुरसाळे गावठाण येथील ७५ वर्षीय पुरुष (मृत) खंडाळा तालुक्यातील अर्बन सिटी धनगरवाडी ५० वर्षीय महिला सातारा तालुक्यातील समर्थनगर, सातारा येथील १९ वर्षीय युवक, करंडी येथील २५ वर्षीय महिला
कराड तालुक्यातील वानरवाडी येथील ७० वर्षीय महिला, १७ वर्षीय युवती फलटण तालुक्यातील जोरगाव येथील २५ वर्षीय महिला, २१ वर्षीय युवक व १२ वर्षांचा मुलगा, कोळकी येथील २५ वर्षीय पुरुष व ५० वर्षीय महिला.
जावळी तालुक्यातील प्रभूचीवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष, कावडी येथील १५ वर्षाचा मुलगा, ५८ वर्षीय पुरुष,४७ वर्षीय पुरुष व १८ वर्षीय युवक. माण तालुक्यातील वडजल येथील ५५ वर्षीय पुरुष अशा १८ जणांचा समावेश आहे. १७५ जण निगेटिव्ह तसेच पुण्यातील एन.सी.सी.एस. यांनी १७५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही कळविले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.