बारामती -लॉकडाऊनमुळे बारामतीत अडकलेले 110 परप्रांतीय मजूर मध्यप्रदेशकडे रवाना झाले. शहरातील प्रशासकीय भवन येथून 5 बसमधून या परप्रांतीय मजुरांची रवानगी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, आगारप्रमुख अमोल गोंजारी यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर प्रशासनाच्या मदतीने परिवहन महामंडळाच्या बसमधून या परप्रांतीय मजुरांना सीमेपर्यंत सोडले जाणार आहे, त्यांना सीमेवरून घरापर्यंत सोडण्याची जबाबदारी मध्यप्रदेश सरकारचे आहे. एका बसमध्ये 22 याप्रमाणे पाच बसमध्ये 110 मजुरांना स्वगृही पाठविण्यात आले आहे.