…तर मोदी लाईव्ह भाषण करून गोंधळ निर्माणच का करतात – प्रकाश आंबेडकर

मुंबई – देशभरात करोना व्हायरस थैमान  घालत असून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. यावेळी मोदींनी स्वावलंबी भारत अभियानाचीही घोषणा केली. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश  आंबेडकर यांनी टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, पंतप्रधान मोदींना कोणतीही वाईट बातमी देशाला द्यायची नाही. हे काम त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अथवा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर सोपवले आहे. बहुदा हा त्यांचा पीआरचा भाग असावा. जर पंतप्रधानांना काही महत्वाचे सांगायचे नव्हते तर ते लाईव्ह येऊन गोंधळ का निर्माण करतात? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

तसेच, पंतप्रधान मोदींनी माध्यम वर्गासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केले. मात्र, असंघटीत आणि स्थलांतरित वर्गासाठी पदरी निराशाच आली आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात मध्यम वर्गाची बाजू घेण्याच्या आणि आर्थिक दुर्बल वर्गाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका दिसून आली. परंतु, याची पुनरावृत्ती चौथ्या टप्प्यातही होणार आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत लाॅकडाऊन 3 वेळा वाढवण्यात आले होते. 18मे ही लाॅकडाऊनची शेवटची तारिख आहे. मात्र आता पुन्हा लाॅकडाऊन वाढवण्यात येणार असल्या पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. तसेच 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणाही पंतप्रधान मोदींनी केली. कुटीर, गृह, लघू उद्योगासाठी पॅकेज, शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचं पॅकेज, मध्यमवर्गीयांसाठीही हे पॅकेज महत्वाचं, भारतीय उद्योग जगतासाठीही हे पॅकेज, उद्यापासून ह्या पॅकेजची सविस्तर माहिती, केंद्रीय अर्थमंत्री माहिती देतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.