पिंपरी, (प्रतिनिधी) – शासकीय चित्रकला परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये एच. ए. स्कूल माध्यमिक विभाग शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये इंटरमिजिएट परीक्षेला ३८ विद्यार्थी तर एलिमेंटरी परीक्षेला ६० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या दोन्ही परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
एकूण ११ विद्यार्थी ‘ए’ ग्रेडमध्ये, ३५ विद्यार्थी ‘बी’ ग्रेडमध्ये व बाकी सर्व विद्यार्थी ‘सी’ ग्रेडमध्ये पास झाले आहेत. त्यामुळे प्रशालेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य व शाळा समितीचे चेअरमन खेमराज रणपिसे, मुख्याध्यापक सुनील शिवले, उप मुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, पर्यवेक्षिका आशा माने, पालक संघ उपाध्यक्ष समाधान गेजगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक कलाशिक्षक रमेश गाढवे यांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.