मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जगातील सर्वाधिक पसंतीच्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. महेंद्रसिंह धोनी व विराट कोहली यांनाही सचिनने मागे टाकले आहे.
या यादीत पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सी आहे.
जगातील सर्वाधिक पसंतीच्या पुरुषांच्या यादीत सचिन 12 व्या, तर आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर या यादीत रोनाल्डो चौथ्या तर मेस्सी सातव्या क्रमांकावर आहे.
पुरुषांच्या यादीत सचिन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किंग खान शाहरुख खान आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही पुढे आहे.